

स्व.अण्णासाहेब पाटील यांचे कार्य असंघटित कामगारांसाठी दीप स्तंभासारखे.. कामगार नेते इरफान सय्यद..
पिंपरी:-स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त केसबी चौकातील अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी असंख्य माथाडी कामगार उपस्थित होते. स्वातंत्र्यानंतर ६०-७० च्या कालखंडात कामगार मोठ्या प्रमाणात असंघटित होते. तेव्हा कायदे नव्हते त्यामुळे त्यांचे शोषण व्हायचे. आरोग्याच्याही समस्या होत्या. अशा परिस्थितीत स्व. अण्णासाहेब पाटील यांनी कामगारांचे संघटन केले आणि त्यांच्या व त्यांच्या बरोबरील सहकार्याच्या…

मसाप प्रकाशित करणार शहरातील वैभव स्थळांचा काव्यसंग्रह :दहा एप्रिल पर्यंत काव्यरचना पाठवण्याचे मसापचे आवाहन
पिंपरी, पुणे – पाच गावांचे एकत्रीकरण करून पिंपरी चिंचवड नगर पालिकेची स्थापना करण्यात आली. गाव खेड्यांचे शहर, शहराचे महानगर, औद्योगिक नगरी, कामगार नगरी आणि आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे मेट्रो शहर असा नावलौकिक या शहराला प्राप्त झाला आहे. पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्व वाढत असताना शहराच्या भौगोलिक कक्षा देखील वाढत गेल्या. यात पिंपरी चिंचवड शहराच्या…

श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील मंदिर निर्मितीस गती : भाविकांच्या उदंड प्रतिसादामुळे तुकोबारायांचे पहिले मंदिर पूर्णत्वाच्या मार्गावर
पिंपरी : संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त वारकरी संप्रदायाचे भूषण ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माउली) आयोजित भव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे पार पडला. भाविकांच्या उदंड प्रतिसादात पार पडलेल्या सोहळ्यामुळे, श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे उभारण्यात येणाऱ्या भव्यदिव्य मंदिर निर्मितीस गती मिळाली आहे. भाविकांनी सढळ हाताने मदत केल्यामुळे संत तुकोबारायांचे…

एसबीपीआयएम मध्ये अभिनेते अनिल गवस आणि सई खलाटे यांच्या उपस्थितीत “झिंग – २०२५” चे आयोजन
पिंपरी, पुणे – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) येथे “झिंग २०२५” हा सांस्कृतिक कार्यक्रम, विविध बौद्धिक स्पर्धा आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. याचे उद्घाटन प्रसंगी गुरुवारी (दि.२० मार्च) “मिसेस इंडिया २०२४” या फॅशन शोमध्ये प्रथम रणरअप झालेल्या सई खलाटे आणि शनिवारी (दि. २२ मार्च) वार्षिक…

मंदिरांसोबतच शैक्षणिक दालने उभारणे काळाची गरज- श्री १०८ देवनंदिजी महाराज
चिंचवड(प्रतिनिधी) जो पर्यंत आपले मंदिरे- मुर्त्या सुरक्षित आहे तोपर्यंत आपला समाज कुटुंब सुरक्षित आहे. मात्र केवळ मंदिरे उभारून मुर्त्या स्थापन करून भागणार नाही तर समाजातील गरीब मुलांसाठी शैक्षणिक दालने उभी करणे गरजेचे आहे. आम्ही लोकनिधीतून चांदवड( नाशिक) येथे गरीब मुलांसाठी एज्युकेशन हब सुरु करीत आहोत. असे प्रतिपादन परमपूज्य सर्वोदय राष्ट्रसंत प्रज्ञाश्रमण सरस्वताचार्य श्री १०८ देवनंदिजी…

नेहरूनगर न्यायालयात वकिलांनी घेतले ‘ई फाइलिंग’ चे प्रशिक्षण
पिंपरी : पिंपरी नेहरूनगर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात वकिलांसाठी ई फायलिंग व संगणकीय प्रशिक्षणाचा कार्यक्रम रविवारी (दि. १६) घेण्यात आला. ई-फायलिंगसाठी वकिलांची नोंदणी, दावा/तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया, जुन्या प्रकरणात वकीलपत्र दाखल करणे, न्यायालयीन कामकाज आदींबाबत माहिती देण्यात आली. त्याला वकिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुंबई उच्च न्यायालय, जिल्हा व सत्र न्यायालय (पुणे) आणि दिवाणी व…

नाना नानी पार्क मित्र मंडळ चा स्तुत्य उपक्रम
पिंपरी – नाना नानी पार्क मित्र मंडळ, इंद्रायणी नगर, भोसरी ही एक धर्मदाय आयुक्त रजिस्टर सेवाभावी संस्था आहे. मंडळाची स्थापना १२ वर्षांपूर्वी म्हणजे ०३/०३/२०१३ ला झाली. मंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंडळातर्फे वृक्ष संवर्धन (झाडे लावा, झाडे जगवा) हा उपक्रम गुरुवार दिनांक ०६/०३/२०२५ रोजी सकाळी ७ वाजता ओ सर्कल ग्राउंड, एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पाठीमागे, इंद्रायणी नगर…

स्व. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या वाल्मीक कराडला फाशी द्या..शिवसेना युवासेना, भोसरी मतदारसंघातील कार्यकर्त्यांकडून जोडे मारो आंदोलन…
भोसरी प्रतिनिधी – बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच स्व. संतोष देशमुख यांची हत्या अतिशय निंदनीय आहे. त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करीत शिवसेना युवासेना, भोसरी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी घटनेचा निषेध व्यक्त करीत क्रूर आणि खुनी वाल्मीक कराड याच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंञी तसेच शिवसेना मुख्य नेते एकनाथ भाई शिंदे, शिवसेना…

एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये राज्यभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा
पिंपरी, पुणे – मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी माणसांचा अभिमान द्विगणित झाला आहे. भारतात अनेक भाषा बोलल्या जातात त्या विविधतेत एकता आहे. त्यापैकी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर चा हा पहिला मराठी राज्यभाषा दिन मोठ्या उत्साहात रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) एस….

महाराजांचा गनिमी कावा संकटावर मात करण्यासाठी मार्गदर्शक – श्रीनिवास हिंगे
पिंपरी, पुणे – रामायण, महाभारत या प्राचीन ग्रंथांमधील घटनांमधून आपल्याला व्यवस्थापन, नियोजन, नीती, समाजकारण, राजकारण याविषयी मार्गदर्शन मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आपल्याला अडचणीच्या काळात संकटावर मात करण्यासाठी मार्गदर्शक आहे. जिजाऊ मासाहेब, येसूबाई, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी यांचे पराक्रमी चरित्र आजच्या काळातील तरुण पिढीने समजून घेऊन आपले करिअर घडवण्यासाठी त्यातून प्रेरणा घ्यावी असे मार्गदर्शन…