संतनगरमध्ये रामनवमी उत्साहात साजरी

Share

पिंपरी  –  संतनगर मित्र मंडळ आणि हनुमान मंदिर आयोजित राम नवमी निमित्त राम- जन्मोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला.सकाळी १० ते ११ च्या दरम्यान श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्र संतनगर सेक्टर -४ यांच्याकडून रामरक्षा स्तोत्र आणि मारुती स्तोत्र पठण कार्यक्रम उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.

त्यानंतर संतनगर परिसरातील ज्ञानाई महिला भजनी मंडळ आणि वटेश्वर महिला भजनी मंडळ यांचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला .
दुपारी १२ वाजता राम जन्म सोहळा रामभक्त महिला आणि पुरुष, बाल चमू यांच्या उपस्थितीत पार पडला. सर्व राम भक्तांनी यावेळी पुष्पवर्षाव करून श्रीरामाचे दर्शन घेऊन आनंद व्यक्त केला.

राम जन्माचा पाळणा तसेच भजनी मंडळाने राम जन्माचे गीते व सुश्राव्य भजने सादर केली.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाआरतीचा कार्यक्रम महाआरती झाली आणि सर्व रामभक्तांना प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी आपल्या प्रभागातील नगरसेवक श्रीयुत संजय वाबळे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महिला भजनी मंडळांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री विठ्ठल नाना वाळुंज,अरुण इंगळे, चंद्रकांत थोरात काका, राजेश किबिले,साहेबराव गावडे, शशिकांत वाडते,अनिल घाडगे, विश्वनाथ हत्तरगी,गणेश रोटे, अभिनव सागडे,अशोक पोटे, राजेंद्र ठाकूर,अंबादास कुमावत,अशोक वाडेकर,महादेव गोमे,संजय मेरगळ इ. परिसरातील नागरिकांनी व देणगीदारांनी मोलाचे सहकार्य केले .