ब्रेकिंग न्यूज

मसाप प्रकाशित करणार शहरातील वैभव स्थळांचा काव्यसंग्रह :दहा एप्रिल पर्यंत काव्यरचना पाठवण्याचे मसापचे आवाहन

पिंपरी, पुणे – पाच गावांचे एकत्रीकरण करून पिंपरी चिंचवड नगर पालिकेची स्थापना करण्यात आली. गाव खेड्यांचे शहर, शहराचे महानगर, औद्योगिक नगरी, कामगार नगरी आणि आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे मेट्रो शहर असा नावलौकिक या शहराला प्राप्त झाला आहे. पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्व वाढत असताना शहराच्या भौगोलिक कक्षा देखील वाढत गेल्या. यात पिंपरी चिंचवड शहराच्या…

Read More

महाराजांचा गनिमी कावा संकटावर मात करण्यासाठी मार्गदर्शक – श्रीनिवास हिंगे

पिंपरी, पुणे – रामायण, महाभारत या प्राचीन ग्रंथांमधील घटनांमधून आपल्याला व्यवस्थापन, नियोजन, नीती, समाजकारण, राजकारण याविषयी मार्गदर्शन मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आपल्याला अडचणीच्या काळात संकटावर मात करण्यासाठी मार्गदर्शक आहे. जिजाऊ मासाहेब, येसूबाई, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी यांचे पराक्रमी चरित्र आजच्या काळातील तरुण पिढीने समजून घेऊन आपले करिअर घडवण्यासाठी त्यातून प्रेरणा घ्यावी असे मार्गदर्शन…

Read More

साहित्य ही महाराष्ट्राची संस्कृती – उदय सामंत

पिंपरी, पुणे – बाराशे साहित्यिक व साहित्यप्रेमी एकत्र येऊन संमेलनानिमित्त प्रवास करणे हा जागतिक विक्रम आहे. चार साहित्यिक एकत्र आल्यावर चांगले विचार ऐकायला मिळतात. साहित्य आणि साहित्यिक म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आहे. या संस्कृतीची जपणूक या संमेलनानिमित्ताने होत आहे, असे प्रतिपादन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. सरहद, पुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे…

Read More

उपक्रमशील शाळा, गुणवंत मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा निगडीत सन्मान

पिंपरी – पिंपरी-चिंचवड माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा परिषद (शिक्षण विभाग) आणि आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात पिंपरी, चिंचवड व भोसरी परिसरातील सुमारे 90 हुन अधिक शाळा सहभागी झाल्या असून मुख्याध्यापक, शिक्षक…

Read More

लौट्टेच्या आईस्क्रीम उत्पादन सुविधेचे पुण्यात उद्घाटन

पुणे : लौट्टे ने आपल्या जागतिक विस्ताराच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठत पुण्यात आपल्या सर्वात मोठ्या अत्याधुनिक उत्पादन सुविधेची घोषणा केली. सुविधेचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, लौट्टे समुहाचे अध्यक्ष डाँग बीन शीन, रिपब्लिक ऑफ…

Read More

रावेतमधील स्वप्नपूर्तीचे अध्यक्ष रविंद्र हिंगे यांचं सोसायटीधारकांना सहकार्याच आवाहन…

पिंपरी प्रतिनिधी :- नुकतेच ताथवडे येथील ‘आयटेन लाईफ टू’ या सोसायटीने त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बॅचलर बंदीचा जाचक निर्णय घेत कायद्याचे उल्लंघन केलेले आहे. सोसायटीच्या प्रवेशद्वारावर तसा फलकही लावलेला आहे. त्याची माहितीसुध्दा काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेली आहे. मुळात ही बाब आता केवळ एका सोसायटीपुरतीच मर्यादित न राहता त्याच अनुकरण भविष्यात इतर सोसायट्यादेखील करू शकतात. त्यामुळे…

Read More

पीसीपीच्या विद्यार्थ्यांची बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धेत हॅट्रिक

  पिंपरी, पुणे – इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशन, डी.१ झोन च्या वतीने विविध वैयक्तिक व सांघिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धेत सलग तीन वर्ष विजेतेपद मिळवून हॅट्रिक केली. कॅरम स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड पॉलीटेक्निक (पीसीपी) मधील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. पीसीपीच्या संघाने या…

Read More

प्रभू विश्वकर्मा जयंती महोत्सवाचे निगडीत आयोजन

पिंपरी –विश्वकर्मीय समाज पिं-चिं शहर सामाजिक संस्था व सकल विश्वकर्मीय समाजाच्या वतीने प्रभू विश्वकर्मा जयंती महोत्सवानिमित्त भव्य रथयात्रा व मिरवणूक सोमवार, दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी सायं पाच ते आठ वा. या वेळेत काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्य समन्वयक विद्यानंद मानकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेत सुतार,लोहार, सोनार, शिल्पकार,तांबट या विश्वकर्मीय समाजाचे प्रतीक…

Read More

कोकणाचा सिंचन आणि उद्योगाचा अनुशेष भरून काढणार – मंत्री योगेश कदम

पिंपरी, पुणे – पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ आणि कोकणाचा विकास झाला नाही हे वास्तव आहे. कोकणाचा विकासाचा आणि सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे असे प्रतिपादन गृह आणि महसूल ग्रामीण विकास पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड आणि पुण्यामधील कोकण वासिय…

Read More

पीसीसीओईआरला युजीसीची स्वायत्तता प्रदान 

 पिंपरी, पुणे – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालयाला (पीसीसीओईआर) पुढील दहा वर्षांसाठी विश्वविद्यालय अनुदान आयोगाची (युजीसी) शैक्षणिक स्वायत्तता मिळाली असून पीसीसीओईआर महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.       पीसीसीओईआर तंत्रज्ञान व अभियांत्रिकीचे उत्तम शिक्षण, उत्कृष्ट निकाल व संशोधनातील विक्रमांमुळे प्रसिद्ध आहे. महाविद्यालयाची आजवरची…

Read More