आळंदी (वेध न्यूज) चऱ्होली येथील सुखदेव वाघेरे यांच्या शेतातील उसाला गुरुवारी सायंकाळी लागली .आगीमुळे शेतातील उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .रात्री ९.३० वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलास यश आले. शेताला लागूनच संत तुकाराम कॉलनी असल्याने परिसरातील नागरिकांमंध्ये भीतीचे वातावरण होते.आगीवर नियंत्रण मिळाल्याने पुढील अनर्थ टळला. सदरची आग फटाक्यामुळे लागल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले .
नानाश्री लॉन्स जवळ असलेल्या आगीची माहिती मिळताच आळंदी पोलीस स्टेशन चे हवलदार सूर्यवंशी मेजर यांनी आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलास दिली,अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी दाखल होण्यासाठी संत तुकाराम कॉलनी चा रस्ता लहान असल्याने गाडी जाण्यासाठी अडथळा होत होता स्थानिकांच्या मदतीने घटनास्थळी पोहोचल्यावर आग विझविण्यास सुरुवात केली.
यावेळी आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलाचे प्रसाद बोराटे, विलास पवार, अक्षय त्रिभुवन, दिग्विजय तौर, तुळशीराम कोळपे हे घटनास्थळावर हजर होते. तसेच आळंदी पोलीस स्टेशनचे पीएसआय दुधमळ,पोलीस हवलदार लोणकर,जगदाळे,सूर्यवंशी,जगताप, निकाळजे हे घटनास्थळी हजर होते. अंधारामुळे नुकसानाची माहिती मिळू शकली नाही. घटनास्थळी पीएमआरडीए चे अग्निशमन दल देखील हजर झाले होते.
आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत तत्काळ घटनास्थळी पोहचून शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्याने चऱ्होली ग्रामस्थांनी अग्निशमन कर्मचाऱ्यांचा श्रीफळ देवून सन्मान केला.मागील वर्षभरात आगीच्या घटनांमध्ये आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलाने अतिशय उल्लेखनीय कामगिरी बजावली असून याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.