ब्रेकिंग न्यूज

निवडणूक आयोगाने शरद पवारांची ‘ती’ मागणी फेटाळली

Share

केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक जाहीर करण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांवर उत्तरे दिली. शरद पवार यांनी निवडणूक आयोगाकडे केलेली मागणी फेटाळल्याचे सांगितले.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक ही २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तुतारी आणि पिपाणी चिन्हामुळे लोकसभेला मोठा गोंधळ झाला होता. यावेळी पिपाणी चिन्ह फ्रीज करणार आहात का ? तशी मागणी शरद पवार यांच्या पक्षाने केली आहे, त्या प्रश्नावर बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे 2 मागण्या केल्या होत्या.

त्यात तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह लहान आहे ते मोठे करण्याची पहिली मागणी त्यांनी केली होती. तसेच दुसरी मागणी त्यांनी पिपाणी चिन्ह गोठवण्याची केली होती.ही मागणी निवडणूक आयोगाने अमान्य केली आहे. आयोगाने म्हटले की पिपाणी हे चिन्ह पूर्णपणे वेगळे आहे. त्यामुळे त्याला आम्ही हात लावला नाही.