पिंपरी – नाना नानी पार्क मित्र मंडळ, इंद्रायणी नगर, भोसरी ही एक धर्मदाय आयुक्त रजिस्टर सेवाभावी संस्था आहे. मंडळाची स्थापना १२ वर्षांपूर्वी म्हणजे ०३/०३/२०१३ ला झाली. मंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंडळातर्फे वृक्ष संवर्धन (झाडे लावा, झाडे जगवा) हा उपक्रम गुरुवार दिनांक ०६/०३/२०२५ रोजी सकाळी ७ वाजता ओ सर्कल ग्राउंड, एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पाठीमागे, इंद्रायणी नगर या ठिकाणी राबविण्यात आला.
सदरील कार्यक्रमात ओ सर्कल वरील २८५ झाडांची माती भुसभुशीत करणे व त्यांना टँकर द्वारे पाणी देणे अशाप्रकारे उपक्रम राबवला. या उपक्रमात मंडळाच्या ५५ सभासदांनी प्रत्यक्ष काम करण्यासाठी भाग घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रासकर, वरिष्ठ सल्लागार श्री दत्तात्रय दिवटे, खजिनदार श्री अशोक तनपुरे, सचिव श्री मधुकर गुंजकर, सहसचिव श्री बशीर भाई, कार्याध्यक्ष श्री माणिक पडवळ, उपाध्यक्ष श्री रमेश साळुंखे, श्री आबासाहेब रुपनवर, श्री प्रकाश सोमवंशी, श्री विनोद झांबरे पाटील व इतर सर्व पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.