ब्रेकिंग न्यूज

अर्थतज्ञ टिळक यांना रोटरी गौरव वित्तीय सेवा पुरस्कार प्रदान 

पिंपरी(प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी, पिंपरी तर्फे “रोटरी गौरव २०२५ – वित्तीय सेवा” हा पुरस्कार जेष्ठ अर्थतज्ञ  चंद्रशेखर टिळक यांना रोटरी डिस्ट्रिक ३१३१ चे नियोजित प्रांतपाल रो.नितीन ढमाले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.   कार्यक्रमाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी पिंपरी आणि आय. सी. ए. आय. पिं-चिं शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने  चंद्रशेखर टिळक यांचे “अमृतकाळातील केंद्रीय…

Read More

भक्तिमय वातावरणात विश्वकर्मा जयंती साजरी प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेची रथयात्रेतून मिरवणूक

निगडी (प्रतिनिधी) : विश्वकर्मीय समाज पिं-चिं शहर सामाजिक संस्था समाजाच्या वतीने संपूर्ण सृष्टीचे सृजन कर्ता म्हणजेच विश्वाचे पहिले शिल्पकार व वास्तुकार प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेची रथयात्रा मिरवणूक काढून भक्तिमय वातावरणात विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सुतार, लोहार, सोनार, शिल्पकार, तांबट या विश्वकर्मीय समाजाचे प्रतीक असलेल्या पंचरंगी ध्वज उंचावत मिरवणुक आकुर्डी खंडोबा मंदीर चौक येथे…

Read More

भंडारा डोंगरावर दशमी सोहळा संपन्न

देहू, : वारकरी संप्रदायात अनन्य साधारण महत्त्व असलेला आणि एक मोठी परंपरा लाभलेला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अनुग्रह दिवस असलेला अर्थात माघ शुद्ध दशमीचा सोहळा आज श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने डोंगरावर दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. माघ शुद्ध दशमी हा जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचा अनुग्रह दिवस म्हणून ओळखला…

Read More

लौट्टेच्या आईस्क्रीम उत्पादन सुविधेचे पुण्यात उद्घाटन

पुणे : लौट्टे ने आपल्या जागतिक विस्ताराच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठत पुण्यात आपल्या सर्वात मोठ्या अत्याधुनिक उत्पादन सुविधेची घोषणा केली. सुविधेचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, लौट्टे समुहाचे अध्यक्ष डाँग बीन शीन, रिपब्लिक ऑफ…

Read More

रावेतमधील स्वप्नपूर्तीचे अध्यक्ष रविंद्र हिंगे यांचं सोसायटीधारकांना सहकार्याच आवाहन…

पिंपरी प्रतिनिधी :- नुकतेच ताथवडे येथील ‘आयटेन लाईफ टू’ या सोसायटीने त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बॅचलर बंदीचा जाचक निर्णय घेत कायद्याचे उल्लंघन केलेले आहे. सोसायटीच्या प्रवेशद्वारावर तसा फलकही लावलेला आहे. त्याची माहितीसुध्दा काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेली आहे. मुळात ही बाब आता केवळ एका सोसायटीपुरतीच मर्यादित न राहता त्याच अनुकरण भविष्यात इतर सोसायट्यादेखील करू शकतात. त्यामुळे…

Read More

पीसीपीच्या विद्यार्थ्यांची बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धेत हॅट्रिक

  पिंपरी, पुणे – इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशन, डी.१ झोन च्या वतीने विविध वैयक्तिक व सांघिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धेत सलग तीन वर्ष विजेतेपद मिळवून हॅट्रिक केली. कॅरम स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड पॉलीटेक्निक (पीसीपी) मधील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. पीसीपीच्या संघाने या…

Read More

प्रभू विश्वकर्मा जयंती महोत्सवाचे निगडीत आयोजन

पिंपरी –विश्वकर्मीय समाज पिं-चिं शहर सामाजिक संस्था व सकल विश्वकर्मीय समाजाच्या वतीने प्रभू विश्वकर्मा जयंती महोत्सवानिमित्त भव्य रथयात्रा व मिरवणूक सोमवार, दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी सायं पाच ते आठ वा. या वेळेत काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्य समन्वयक विद्यानंद मानकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेत सुतार,लोहार, सोनार, शिल्पकार,तांबट या विश्वकर्मीय समाजाचे प्रतीक…

Read More

अष्टपैलु खेळाडू कुमारी भाविका मनोजकुमार अहिरेचा नागरी सत्कार….

  भोसरी प्रतिनिधी :- मलेशियात खेळल्या गेलेल्या आयसीसी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने द. आफ्रिकेचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. यात पिंपरी चिंचवड शहर व भोसरी मतदारसंघातील 17 वर्षीय अष्टपैलु खेळाडू फलंदाज आणि यष्टिरक्षक भाविका मनोजकुमार अहिरे हिचा देखील मोलाचा वाटा आहे. या कामगिरीमुळे पिंपरी चिंचवड शहर व भोसरी मतदारसंघात उत्साहाचे…

Read More

कोकणाचा सिंचन आणि उद्योगाचा अनुशेष भरून काढणार – मंत्री योगेश कदम

पिंपरी, पुणे – पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ आणि कोकणाचा विकास झाला नाही हे वास्तव आहे. कोकणाचा विकासाचा आणि सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे असे प्रतिपादन गृह आणि महसूल ग्रामीण विकास पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड आणि पुण्यामधील कोकण वासिय…

Read More

पीसीसीओईआरला युजीसीची स्वायत्तता प्रदान 

 पिंपरी, पुणे – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालयाला (पीसीसीओईआर) पुढील दहा वर्षांसाठी विश्वविद्यालय अनुदान आयोगाची (युजीसी) शैक्षणिक स्वायत्तता मिळाली असून पीसीसीओईआर महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.       पीसीसीओईआर तंत्रज्ञान व अभियांत्रिकीचे उत्तम शिक्षण, उत्कृष्ट निकाल व संशोधनातील विक्रमांमुळे प्रसिद्ध आहे. महाविद्यालयाची आजवरची…

Read More