चिंचवड(प्रतिनिधी) जो पर्यंत आपले मंदिरे- मुर्त्या सुरक्षित आहे तोपर्यंत आपला समाज कुटुंब सुरक्षित आहे. मात्र केवळ मंदिरे उभारून मुर्त्या स्थापन करून भागणार नाही तर समाजातील गरीब मुलांसाठी शैक्षणिक दालने उभी करणे गरजेचे आहे. आम्ही लोकनिधीतून चांदवड( नाशिक) येथे गरीब मुलांसाठी एज्युकेशन हब सुरु करीत आहोत. असे प्रतिपादन परमपूज्य सर्वोदय राष्ट्रसंत प्रज्ञाश्रमण सरस्वताचार्य श्री १०८ देवनंदिजी महाराज यांनी काढले.
चिंचवड उद्योग नगर येथील सकल जैन समाज पारस भवनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री १००८ पार्श्वनाथ जैन मंदिरात मूर्ती स्थापना व प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी ते बोलत होते.
पंचकल्याण महोत्सवाला परमपूज्य सर्वोदय राष्ट्रसंत प्रज्ञाश्रमण सरस्वताचार्य श्री १०८ देवनंदिजी महाराज व संघाचे मंगलमय सान्नीध्य लाभले.
समाजाचा खर्च कमी होण्यासाठी श्री १००८ दिगंबर जैन मंदिर गंज पेठ, पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर चिंचवड, श्री १००८ मुनिसुरतनाथ दिगंबर जैन मंदिर कोंडवा ब्रु या तिन्ही मंदिराचा सामूहिक मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा (पंचकल्याण) महोत्सव मार्केट यार्ड येथे करण्यात आले.अशी घटना अध्यात्मिक क्षेत्रात बहुदा देशात प्रथमच घडली आहे.
यावेळी गुरुदेव आणि संघ यांची मिरवणूक एसकेएफ कपंनी गेट समोरून सुरु झाली. भोईर नगर मार्गे पारस भवन या दरम्यान काढण्यात आली.यावेळी मंदिराचे पदाधिकारी आणि भक्त,इंद्र इंद्रानी देव देवातांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंदिराचे सर्व पदाधिकारी आणि हितचिंतक यांनी विशेष परिश्रम घेतले.