पिंपरी (वेध न्यूज )शिवनेर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, भोसरी या संस्थेच्या वतीने दीपावली निमित्त स्नेहछाया परिवार दिघी तसेच स्नेहवन संस्था वडगाव घेनंद येथील संस्थेमधील गरीब, अनाथ, गरजु विद्यार्थ्यांना दीपावली निमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला.
यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष मुकुंद आवटे, उपाध्यक्ष सुहास गटकळ, संचालक कैलास आवटे, निंबा डोळस, मुबीन तांबोळी,मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण हाडवळे आदी उपस्थित होते. स्नेहछाया परिवारातर्फे संस्थापक दत्तात्रय इंगळे सर तसेच स्नेहवन संस्थेचे संस्थापक अशोक देशमाने सर यांनी शिधा स्वीकारला .
- शिवनेर नागरी पतसंस्था ही महाराष्ट्र शासन सहकार भूषण पुरस्कार प्राप्त असलेली पिंपरी चिंचवड शहरातील अग्रगण्य पतसंस्था आहे. पतसंस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात यामध्ये प्रामुख्याने गुणवंत विध्यार्थी सत्कार, पंढरपूर येथे जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखीला अन्नदान, वृक्षारोपण ,सभासदांसाठी दीपावली निमित्त भेटवस्तू , वैद्यकीय शिबीर, पुरग्रस्थताना मदत, कोविड कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाला एक लाख एक्कावन्न हजाराचा मदत निधी अशा प्रक्रारे उल्लेखनीय उपक्रम राबविणारी पतसंस्था म्हणून नावलौकिक मिळवला आहे .
पतसंस्थेचे सुमारे चार हजार सभासद आहेत .संचालक मंडळात बाळासाहेब गुंजाळ, सूर्यकांत काळे, गुलाब औटी,प्रवीण गटकळ,संतोष बिलेवार,वसंत कुटे,शांतिश्वर पाटील,अनिल कातळे ,संगीता इंगळे, ज्योती हांडे कार्यरत आहेत.