मुलींचे भवितव्य सुरक्षित राहावे हा प्रमुख उद्देश समोर ठेवू सरकारने सुकन्या समृद्धी योजना लागू केलेली आहे. तर आयुष्याच्या उत्तरार्धात आर्थिक अडचण येऊ नये म्हणून सरकारने पीपीएफ या योजनेला सुरुवात केलेली आहे. या दोन्ही योजनेतील काही नियम सध्या बदलले आहेत.
पीपीएफ योजनेच्या नियमात नेमका कोणता बदल ?
पीपीएफ योजनेतील पहिला बदल – अल्पवयीन पाल्यासाठी खोलण्यात आलेल्या पीपीएफ अकाऊंटसंदर्भात पहिला नियम बदलण्यात आला आहे. या नव्या नियमानुसार आता अल्पवयीन मुलांसाठी खोलण्यात आलेल्या पीपीएफ अकाऊंटवर संबंधित मुलगा 18 वर्षांचा होईपर्यंत पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंटच्या हिशोबाने व्याज मिळेल. त्यानंतर मुलगा 18 वर्षांचा झाल्यानंतर PPF योजनेनुसार व्याजदर लागू होईल. तसेच म्यॅच्यूरीचा कालावधी 18 व्या वर्षांपासून मोजला जाईल.
दुसरा बदल- एकापेक्षा अधिक पीपीएफ खाते असतील तर प्रायमरी खात्यावर सध्याचा व्याजदर लागू होईल. तसेच सेकंडरी खात्याला प्रायमरी खात्यात मर्ज केले जाईल. दोनपेक्षा अधिक खाते असतील तर त्या खात्यांवर खाते चालू केलेल्या तारखेपासून शून्य व्याज मिळेल.
सुकन्या समृद्धी योजनेतील बदल
आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून सुकन्या समृद्धी योजनेत बदल झाले आहेत. नव्या नियमानुसार आजोबा-आजीने संबंधित मुलीच्या नावे Sukanya Samriddhi योजनेत खाते चालू केले असेल तर असे खाते मुलीच्या आई-वडिलांकडे वर्ग करण्यात येईल. दोनपेक्षा अधिक खाते असतील तर अतिरिक्त असलेले खाते बंद करण्यात येईल.
Hi, this is a comment.
To get started with moderating, editing, and deleting comments, please visit the Comments screen in the dashboard.
Commenter avatars come from Gravatar.