ब्रेकिंग न्यूज

“स्वर निनाद दिवाळी पहाट …” नाना नानी पार्क मित्र मंडळाची इंद्रायणीकारांना सुखद भेट

Share

भोसरी (वेध न्यूज) नाना नानी पार्क मित्र मंडळ इंद्रायणीनगर यांच्या वतीने नरक चतुर्दशी निमित्त स्वर निनाद या दिवाळी पहाट या कार्यक्रमाची
सुरेल संगीत मैफिलीची भेट मिळाली. सर्कल वॉकींग ग्रॉऊंड ,एम आय डी सी पोलीस स्टेशन च्या पाठीमागे या कार्यक्रमाचे आयॊजन करण्यात आले होते .

भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे, नाना नानी पार्क मित्र मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत दादा रासकर सचिव मधुकर गुंजकर ,सचिव अशोक तनपुरे आदी मानवारांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला.

सूर नवा ध्यास नवा या पर्वाची महाविजेती सन्मिता धापटे शिंदे यांनी कानडा राजा पंढरीचा या भक्तिगीतावर संगीत रसिकांना मंत्रमुग्ध केले.ऐरणीचा देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे आभाळागत माया तुझी आम्हावर राहूदे ,रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी अशी भक्तीगीत ते लावणी सादर करीत प्रेक्षकांना तृप्त केले सा.रे. ग. म फेम आणि इंडियन आयडॉल मध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहचलेला पिंपरी चिंचवड मधील गायक संदीप उबाळे याने काळी माती निळं पाणी हिरवं शिवार , तू रिम रिमझिम झरणारी बरसात , या  गीतांसह अनेक बहारदार गाण्यांनी स्वर मैफिलीचा साज चढविला.

सन्मिता धापटे शिंदे आणि संदीप उबाळे यांनी कोंबडी पाळली , अश्विनी जगू कशा तुझ्याविना मी राणी ग , या द्वंद्व गीतांनी रसिकांना ताल धरायला लावला.
भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची अलंकापुरी भारावली , माउली माउली चा गजरात कार्यक्रमाची सांगता झाली.

सांगीतिक मैफिलीला आध्यात्माची योग्य ती पेरणी करत ऋतुजा फुलकर यांनी सूत्रसंचालन केले .

याप्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी संचालक पदावर प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांची निवड झाल्याबद्दल संयोजकांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला .

अजित गव्हाणे यांनी जेष्टांमधील तरुणांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे विशेष कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला माजी नगरसेवक संजय वाबळे,माजी नगरसेवक विक्रांत लांडे,उद्योजक संजय उदावंत,शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश मुटके, भूगोल फौंडेशनचे विठ्ठल नाना वाळुंज ,शिवनेर नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष मुकुंद आवटे यासह परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

या सांगितिक कार्यक्रमासाठी दत्तात्रय दिवटे( दाजी ) विजय खळदकर ,संजय सातव पाटील, रमेश साळुंखे ,भरत सातपुते ,रंगनाथ गायकवाड, संजय कारगळ , विनोद झांबरे पाटील , उदयसिंह येळे यांनी विशेष योगदान दिले .